
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील सेक्स वर्कर महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी अधिकारी पत्रकार बैठकीत चर्चा तहसीलदार ज्योती देवरे यांच्या दालनात संपन्न झाली.
येथील गांधलीपुरा भागात राहणाऱ्या महिला अतिशय निराश अवस्थेत आहेत गेल्या दोन-तीन वर्षापासून मानवी वाहतुकीच्या नावाच्या खोट्या केसेस दाखल होत आहेत मागील महिन्यात (नाव बदललेलं)जकिरा नावाची आमची भगिनी तिच्या राहत्या घरातून घेऊन गेले तिच्यावर धंदा करणाऱ्या बाईचा जीवावर जगणारी व्यक्ती म्हणून गुन्हा दाखल केला ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे या जाकिरा सारख्याच अनेक महिला बळी पडल्या आहेत त्यांच्याकडे सापडलेल्या महिला अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले नाही ना मानवी तस्करी सिद्ध झाली नाही.
परंतु पोलिसांना स्थानिक गुन्हे व राजकारणी यांच्याकडून अर्ज करण्यात येतात सतत अन्याय करतात व दहशत माजवतात याबाबत स्थानिक अधिकारी आणि राजकारणी यांच्याशी त्या महिलांनी अनेकदा विनवण्या केल्या परंतु हिंसा वाढली पुण्याच्या फ्रीडम नावाच्या संस्थेने सुरुवातीला येथील महिलांचे नाव सांगितले महिलांना मानव तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली मात्र एकही अल्पवयीन मुलगी याठिकाणी सापडलेली नाही गांधलीपुरा भागात नदी काठी घरे जाळून टाकली आहेत तसेच शिवीगाळ करण्यात आली आहे. अशा दहशतीच्या वातावरणाला व सतत होणाऱ्या अन्यायाला आम्हांस सामोरे जावे लागत आहे त्यामुळे जगण्याचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी या प्रश्नाची दखल घ्यावी अशा आयशयाचे निवेदन मुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्री, मानवी हक्क आयोग पोलीस आयुक्त नाशिक तहसीलदार पोलीस अधीक्षक डीवायएसपी, प्रांताधिकारी, पोलिस निरीक्षक आदींना हे निवेदन देण्यात आले आहे.
यावर तहसीलदार ज्योती देवरे आधार संस्थेच्या भारती पाटील, व पत्रकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते यावेळी या महिलांसाठी सकारात्मक चर्चा होऊन प्रबोधन व जनजागृती व कला कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली व निवडणूक संपल्यावर या विषयावर याबाबत काम सुरू करण्याचा निर्णय चर्चेत झाला.