🔷 चालू घडामोडी :- 11 जुलै 2025
◆ मॅग्नस कार्लसनने झाग्रेब, क्रोएशिया येथे झालेल्या सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ 2025 स्पर्धा जिंकली आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार: ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस’ प्रदान करण्यात आला. [26 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार]
◆ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला 9 जुलै 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण झाले.
◆ भारतातील पहिली UPI-चालित बँक शाखा बेंगळूरु शहरात सुरू झाली आहे. [फिनटेक कंपनी स्लाइसने (Slice) ही शाखा उघडली आहे]
◆ ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे आयोजन भारत देशात करण्यात येणार आहे.
◆ आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 मध्ये भारत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.
◆ आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 चे आयोजन चीन देशात करण्यात आले होते.
◆ आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025 मध्ये चीनने सर्वाधिक 17 पदके जिंकली आहेत.
◆ न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (NDB) सदस्य आता 11 झाले आहेत. [नवीन सदस्य :- कोलंबिया आणि उझबेकिस्तान]
◆ ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (OPCW) ची 23वी आशियाई क्षेत्रीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ जागतिक बँकेने 2025 चा गिनी निर्देशांक (Gini index) जारी केला आहे.
◆ बिहार राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना 35 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ नवी दिल्ली येथे नॅशनल बायो बँक चे उद्घाटन डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रेशन वितरणासाठी आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन (FaceAuth) सुरू करणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
◆ हरियाणा राज्यातील अरवली टेकड्यामध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
◆ 21 वी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा अमेरिकेतील बर्मिंगहॅम, अलाबामा शहरात झाली. [ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते.]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- खबरीलाल