अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी कुर्हे बुद्रुक येथील विजयसिंग राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते व आमदार अनिल पाटील आणि इतर नेते मंडळींच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विजयसिंग राजपूत हे आमदार पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात सुपरिचित असून कुर्हे बु. ग्रुपचे विद्यमान उपसरपंच आहेत. तसेच ग्रामदैवत सती माता ट्रस्ट चे देखील ते सद्स्य आहेत. त्यांचे पक्षांतर्गत कार्य पाहून त्यांना हे तालुकाध्यक्ष पद देण्यात आले आहे. या नियुक्ती बद्दल अमळनेर तालुका राजपूत एकता मंच तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कौतुक केले आहे.