अमळनेर (प्रतिनिधी) खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच पाडळसरे धरण प्रकल्पाला केंद्रीय योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी आणि धार येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शहरातील मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
धार येथील उरुसात सहभागी होण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. मागील वर्षी रेल्वे गाडी न थांबविल्यामुळे चैन पुलिंगचा अनुचित प्रकार घडला होता. यावर्षी असे प्रकार टळावेत यासाठी, कोणत्याही लेखी किंवा तोंडी मागणीशिवाय, खासदार स्मिताताईंनी आपल्या पदाचा योग्य वापर करत, संबंधित रेल्वे गाड्यांना उरुसपुरता जरी का असेना, दोन मिनिटांचा थांबा मिळवून दिला. त्यांनी हे अतिशय उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे 20-25 प्रतिनिधींनी त्यांचा सत्कार केला. या सत्कार सोहळ्यात सत्तार मास्टर, ॲड. शकील काझी, अखलाक भाई, जावेद अख्तर, जनाब मुस्तफा सेठ, शब्बीर सेठ, श्याम भाई, तौसिफ तेली, ठाकूर अय्याज बागवान, इस्माईल पठाण, इम्रान मेंबर, अहमद झूलेवाला शाहिद बागवान, अदनान पठाण, आबिद सैय्यद, अब्दुला पठाण, खालिद बागवान, फैजान पठाण, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप जनाब जावेद अख्तर यांच्या प्रेरणादायी कवितेने झाला. शेवटी स्मिताताईंनी समस्त मुस्लिम समाजाला सांगितले की, “माझ्याकडे कोणतेही सामाजिक तथा विकासविषयक काम घेऊन या, मी नेहमीच सेवा करण्यासाठी तयार आहे.”