एकल महिलांचे पाल्य, अनाथ मुलांना शालेय साहित्याचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र व राजरथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील  एकल महिलांच्या पाल्यांना तसेच अनाथ मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील एकल महिलांच्या 25 ते 30 मुला मुलींना उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. याप्रसंगी एकल भगिनी आपल्या मुलांसोबत उपस्थित होत्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. अशा उपक्रमासाठी माजी जिप सदस्य जयश्रीताई अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी देखील मदतीचे आश्वासन दिले. तसेच तालुक्यातील काही सरपंच मित्रांनी आपापल्या परीने योगदान दिले. याप्रसंगी एल. टी. पाटील, निंभोरा सरपंच चंद्रकला सुरेश पाटील, विनोद पाटील, कौमुदी पाटील, पिंपळे माजी सरपंच दिनेश पाटील, मंगरूळ सरपंच समाधान पारधी, देवा पाटील, रवींद्र पाटील (ढेकू), किशोर महाजन तसेच विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. संस्थेकडे अजूनही काही गरजू एकल महिला पाल्य यांची माहिती उपलब्ध असून असे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये याकरिता संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुनील पाटील (9405051700) यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

 

सामाजिक प्रश्नांवर काम करणारी संस्था

 

साऊ एकल महिला समिती ही राज्यभर कोरोनामुळे तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा झालेल्या महिलांसाठी काम करते. अशा महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणे, शासकीय योजनांचा लाभ देणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, पुनर्विवाहसाठी प्रयत्न करणे अशा अनेक प्रश्नांवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू आहे. साऊ एकल महिला समितीचे राज्याचे निमंत्रक तथा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यात प्रा.सुनील पाटील व पायल पाटील हे त्यांच्या राजरथ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून एकल महिलांसाठी काम करतात. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात, बाल संगोपन योजनेचा अनेक अनाथ मुलांना त्यांनी लाभ मिळवून दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *