अमळनेरात पत्त्याचा जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; खेळतांना चौघांना रंगेहाथ पकडले.

अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळील खुली जागेत पोलिसांनी छापा टाकून चौघांना पत्त्याचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडल्याची घटना 26 रोजी दुपारी १ वाजता घडली
पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर , पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत चातुरे , पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे यांनी छापा टाकून नवल मधुकर बोरसे रा पैलाड , गणेश दगा पिंजारी रा शेवाळे ता पारोळा , राकेश पापराम मोरे ,रा मिळचाळ, देविदास विठ्ठल भोई रा भोईवाडा याना ५२ पत्त्याचा झण्णामण्णा जुगार खेळताना पकडण्यात आले त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे करीत आहेत.

तसेच सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणाऱ्या दिनेश प्रवीण पाटील , प्रकाश धुडकू पाटील , शरद देवाजी महाजन , सुभाष देविदास वंजारी , कपिल मदन वंजारी , चंद्रकांत यशवंत संसारे, सुकलाल अशोक पाटील या सात जनांवर सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड केल्याप्रकरणी पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम 112, 117 प्रमाणे कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *