तांबेपुरा भागातील गायत्री नगरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन सोडवली समस्या

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरातील तांबेपुरा भागातील गायत्री नगरातील रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते गोविंदा बाविस्कर यांनी पुढाकार घेत नगरपालिकाची यंत्रणा राबवत स्वतः हजर राहत ट्रॅक्टरवर मुरूम आणत  टाकून नागरिकांचे होणारे हाल थांबवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेरातील तांबेपुरा भागातील गायत्री नगरात पाईप लाईन कामामुळे चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाली. पावसाळ्यात रस्ते अधिक खराब झाले. येथील युवराज पाटील प्राथमिक शाळेजवळ तर रस्त्याची परिस्थिती खूपच वाईट झाली. परिणामी न.पा. कडे नागरिकांनी तक्रारी करत आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र काम होण्यास विलंब होत होता. अनुषंगाने येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंदा बाविस्कर यांनी पुढाकार घेत नगरपालिकाची यंत्रणा राबवत स्वतः हजर राहत ट्रॅक्टरवर मुरूम आणत रस्त्यावर टाकून नागरिकांचे होणारे हाल थांबवत गैरसोय दूर केली. परिणामी गोविंदा बाविस्कर व नगरपालिका प्रशासनचे परिसरात कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *