लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा ठरला सलोखा, संस्कृतीसह सेवाभावीचा आदर्श

आषाढी एकादशीनिमित्त सर्व सदस्यांनी केली होती पारंपरिक वारकरी वेशभूषा

 

अमळनेर (प्रतिनिधी) लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा स्थापना व पदग्रहण समारंभ शनिवार ६ जुलै रोजी सायंकाळी हॉटेल मिडटाउन, सुभाष चौक येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. विशेष म्हणजे आषाढी एकादशी निमित्त सर्व सदस्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा केली होती. तर त्यांनी अवयवदानाची सामूहिक शपथ घेत समाजासाठी झपाटून काम करण्याचा नवा संकल्प केल्याने कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. तर हा कार्यक्रम सामाजिक सलोखा, संस्कृतीशी नाते आणि सेवाभावी कार्याच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरला.

या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष नितीन विनचुरकर यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमास माजी जिल्हापाल लायन गिरीश सिसोदिया, प्रादेशिक अध्यक्ष चेतन बर्डीया, झोन अध्यक्ष विनोद अग्रवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य वक्ता म्हणून उपस्थित लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशोक सामेल यांनी आपल्या प्रभावी शैलीतून उपस्थितांना सेवेची, संस्कृतीची आणि समाजप्रेमाची प्रेरणा दिली. या वेळी उपस्थित चांगलेच भारावून गेले. कार्यक्रमाची सांगता सेवा, निष्ठा आणि सामाजिक एकतेचा नवा संकल्प घेत करत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डिगंबर महाले व नयना नवसारीकर यांनी केले. आभार नितीन विंचूरकर यांनी मानले.

 

सेवेचा संकल्प….

 

लायन्स क्लबने जवखेडा येथील सानेगुरुजी शाळेतील पीयूष विजय ठाकूर या विद्यार्थ्याला वर्षभरासाठी शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा संपूर्ण खर्च क्लबकडून केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *