अमळनेर(प्रतिनिधी) बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील यांची संकल्पना व पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित आमदार व खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
खासदार स्मिता वाघ व अनिल पाटील यांनी या समाजाभिमुख व रुग्णसेवेसाठी लाभदायक असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. या रुग्णवाहिकेमुळे तालुक्यातील तसेच शहरातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.