अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर टाकरखेडा रोडला राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नियोजित स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले. या ठिकाणी भविष्यात,भव्य अश्वारूढ स्मारक, वृक्षारोपण, शेततळे, क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे.
तालुक्यातील अमळनेर टाकरखेडा रस्त्यावर राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील तत्कालीन पायविहीर असून त्या विहिरीलगत असलेल्या जागेवर ३०१ व्या जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर यांचा भव्य अश्वारूढ स्मारक लोकसहभागातून उभारले जाणार आहे. त्याचे भूमीपूजन महावीर युवा परिषद, अमळनेर, मारवड विकास मंच, पुरोगामी संघटना यांच्या पुढाकाराने ६ रोजी पार पडले. या वेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, मारवड विकास मंचचे प्रणेते संदीप साळुंखे, प्रा. अशोक पवार, मनोहर पाटील, नांद्रे मॅडम, प्रा.डॉ.ए.बी. जैन हिरामण कंखरे, बन्सीलाल भागवत, एस. सी. तेले, दिलीप जैन, प्रकाश छाजेड यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रा. सुभाष पाटील, अरूण देशमुख, मौलाना रियाज शेख, डी. एम. पाटील, सलिम टोपी, अँड शकील काझी, प्रशांत निकम, वसुंधरा लांडगे, रमेशदेव शिरसाठ, गोविंद कंखरे, दशरथ लांडगे, गणेश पवार, विश्वासराव पाटील, दर्शना पवार, वाल्मिक पाटील, दिनकर पाटील, उमेश काटे, दयाराम पाटील, बापूराव ठाकरे, अशोक पाटील, निरंजन पेंढारे, अजय भामरे, रज्जाक शेख, जाकीर शेख, निलेश धनगर, अशोक पाटील, गणेश भोई, प्रकाश भोई, लक्ष्मण पाटील, एन. के. पाटील, महेंद्र साळुंखे, विजय भदाणे, बी. एम. पाटील, इंदजित साळुंखे, वाल्मिक धनगर, अमोल धनगर, कैलास कासार, दिलीप खांडेकर, गुणवंतराव पवार, शामकांत पाटील उपस्थित होते. तसेच यावेळी बहुसंख्येने समाज बांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक हिरामण कंखरे यांनी केले. सूत्रसंचालन एस. सी. तेले यांनी केले तर आभार एन. के. पाटील यांनी मानले.