हिंगोणे बु ग्राम पंचायतीत केदारसिंग राजपूत ने मिळविला शानदार विजय,

अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बु ग्राम पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी आ शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे केदारसिंग कोमलसिंग राजपूत यांचा शानदार विजय झाला असून यानिमित्ताने अमळनेर तालुक्यात सर्वाधिक तरुण लोकनियुक्त सरपंच म्हणूनही मोठा बहुमान त्यांनी मिळविला आहे.
विशेष म्हणजे या तरुण सरपंचाची प्रचंड मताधिक्याने निवड झालील आहे.तसेच ग्रामपंचायत सदस्य पदी आ शिरीष दादा मित्रपरिवाराच्याच सौ अर्चना महेंद्रसिंग पाटील, सौ दयाबाई सिताराम भिल, सौ योगिता उदयसिंग भिल, तानकु बुधा भिल हे प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचा सत्कार आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.गावाने आपल्या मित्रपरिवार आघाडीसह नवं तरुणास पसंती दिल्याने हिंगोणे बु गावाच्या विकासासाठी आपण सदैव तप्तर राहू असे आश्वासन आ चौधरी यांनी यावेळी दिले.याप्रसंगी माजी सरपंच बापू रावण भिल,हरेशकुमार पाटील, भगवान पाटील, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाटील, रमेश पाटील, कल्याण सिंह पाटील, प्रभाकर पाटील, जितेंद्र पाटील, रणजित पाटील, उपस्थित होते.दरम्यान आ शिरीषदादा चौधरी मित्र परिवार जास्तीतजास्त युवकांना राजकीय प्रवाहात आणत असून यानिमित्ताने नव्या पिढीला महत्वपूर्ण पदांवर संधी मिळून विकासासाठी सक्षम नेतृत्व निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नास जनता देखील प्रोत्साहन देत असल्याचे हिंगोणे बु ग्रा प च्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.भविष्यात अनेक महत्वपूर्ण पदांवर युवकच प्रतिनिधित्व करताना दिसतील असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.