अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथील किशोरवयीन १४ ते १८ वर्षे वयोगटातील बालिकांच्या स्नेही पंचायत उपक्रम राबवण्यात आला. यात सरपंच गायत्री विनोद पाटील यांचे नेतृत्वाखालील उपसरपंच व ११ ग्रा.पं. सदसस्यांनी ग्राम पंचायतीचा कारभार चालवला. याचे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.
जिप मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील किशोरवयीन १५ मुलींची निवड करून त्यातून सरपंच व उपसरपंच निवडून स्नेही बालिका पंचायतची स्थापना करून विविध उपक्रम राबवणे कन्या बँक, वृक्ष रोपण, दारू बंदी, शालेला आरओ,मुलींसाठी पोस्ट ऑफिस किंवा गावात एफडी, वृक्षारोपण करणे, मुलींसाठी पौष्टिक आहाराचे वाटप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करणे. कुमारवयीन मुलींचे आरोग्याची काळजी करणेसाठी विविध आरोग्य सुविधा बाबतचे कॅम्प घेणे, लोकसहभागातून पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करणे. सरपंच वर्षा युवराज पाटील, सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोसले, स्नेही बालिका पंचायतच्या सरपंच गायत्री विनोद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. स्नेही बालिका पंचायतच्या सरपंच गायत्री विनोद पाटील, उपसरपंच लीना प्रमोद पाटील व सर्व सदस्य व सर्व शिक्षक वृंद ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील एक झाड आईच्या नावाने लावू मोठ्या उत्साहाने परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
महिला बचत गटाला यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येकी एका गटाल दह झाडे वाटप करण्यात आले.