अमळनेर (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकरी व सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन 7 जुलै रोजी करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता होणार आहे.
आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैल जोडी असणाऱ्या तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी सभासदांना पोळा सणासाठी बैलांचा साज वाटप शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच अनिल पाटील यांची शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात येणार आहे. या शैक्षणिक साहित्याचे वाटप तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येईल.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मापाडी कामगारांसाठी लॉकर उपलब्ध करून देण्यात येणार असून मापाडी यांना वैयक्तिक लॉकरच्या किल्ल्या वाटप आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तरी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी सभासद तसेच आमदार अनिल पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळ यांचेकडून करण्यात आले आहे.