अमळनेर (प्रतिनिधी) शहर कक्ष १ चे सहाय्यक अभियंता हेमंत सैंदाणे यांनी कक्षातील २० जनमित्रांना स्वखर्चातून सुरक्षा साधने विकत घेऊन वितरित केले. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
सैंदाणे यांची कर्मचाऱ्याप्रती असलेली आत्मियता व सुरक्षा विषयी जागरुकतेमुळे सुरक्षा साधनांची वाटप करून “शून्य अपघात महावितरण” संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणली. त्याबद्दल त्यांचे कक्ष कार्यालयात जाऊन कौतुक करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना नियमितपणे सुरक्षेच्या साधनांचा वापर करूनच तसेच नियमांचे पालन करून लाईन वरील कामकाज करण्याबाबत मार्गदर्शन केले.