अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व राजीव गांधी प्राथमिक विद्यामंदिर यांच्यातर्फे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढण्यात आली. पालखी सजवून विठ्ठल रुक्माई यांची प्रतिमा पालखीत ठेवून टाळ मृदंगांच्या गजरात विठ्ठल रुक्माई यांच्या गाण्याच्या तालासुरात सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी यांनी ठेका घेतला होता. यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
प्राचार्य पी.एम .कोळी यांनी विद्यार्थ्यांना दिंडीमध्ये केळी व चॉकलेट वाटप केले. गावातून मुख्य चौकांमधून विद्यार्थ्यांची पालखी-दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती. दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीना खैरनार, चतुर पाटील तसेच प्राचार्य पी.एम .कोळी, ज्युनिअर विभागाचे प्रमुख सुनील साळुंखे, ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील, सुनील वाघ, गोपाल हडपे, विजेंद्र गवळे, नितीन पाटील, दीपक पाटील, समाधान पाटील,आर .आर. पाटील, किरण पाटील, कल्याण नेरकर, निलिमा पाटील,रूपाली पाटील,सतीश बाविस्कर, संदीप पवार आदी दिंडीत सहभागी होऊन विद्यार्थ्यांची काळजी घेत होते.