कुऱ्हे बु दहिवद खु लोणसीम येथील सरपंच बिनविरोध
मालपुर ग्रामपंचायतीवर प्रफुल्ल पाटील यांचे वर्चस्व कायम
अमळनेर तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल घोषित
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद सदस्या मिनाबाई पाटील यांचे पॅनल पराभूत तर जनहित परिवर्तन पॅनलचा झेंडा फडकला आहे. तर मालपुर ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंच प्रफुल्ल पाटील यांचे वर्चस्व कायम आहे. तर कुऱ्हे बु दहिवद खु लोणसीम येथील सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत.
तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणूकिचा निकाल सोमवारी घोषित झाला असून यात मोठया ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत कार्यक्रम सुरू असून यानुसार लोण बु, दहिवद बु, दहिवद खु, खडके, हिंगोणे बु, निसर्डी, लोण सीम, कुऱ्हे खु, तळवाडे, मालपुर आदी १० गावांमध्ये निवडणूक झाली.
त्यात बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सदस्य 32 व सरपंचदासाठी 1 जण बिनविरोध झाले आहेत. सदस्यपदासाठी 91 जण व तर सरपंचपदासाठी 19 उमेदवार असे उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी मतमोजणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आली होती. सर्वात लक्षवेधी लढत दहिवद बु येथे होत असून त्यात दोन पॅनल मध्ये काट्याची लढत झाली आहे. त्यात पॅनल प्रमुख अशोक तुळशीराम पाटील जयवंतराव गुलाबराव पाटील विक्रम चिंधु माळी यांचे जनहित परिवर्तन पॅनल दहिवद हे पॅनल असून सरपंच पदाचे उमेदवार सुषमा वासुदेव पाटील या लोकनियुक्त पदासाठी (1844) मतांनी विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य मिनाबाई पाटील रमेश काशिनाथ पाटील प्रवीण काशिनाथ माळी यांचे आपलं गाव आपला पॅनल हे पॅनल लढत देत होते. त्यात लोकनियुक्त सरपंचपदाचे उमेदवार छाया प्रवीण माळी यांना (1286) मते प्राप्त झाली. ग्रामपंचायतीत एकूण सदस्य संख्या 13 इतकी आहे. त्यात जनहित परिवर्तन पॅनलला 8 जागा तर विद्यमान जिल्हा परिषद सदस्या मिनाबाई पाटील व त्यांचे पती रमेश काशीनाथ पाटील यांच्या आपल गाव आपल पॅनलला 5 जागांवर समाधान मानावे लागले विरोधकानी सत्ता खेचून आपल्याकडे नेली असून याकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.
दहिवद सदस्य पुढील प्रमाणे देवानंद कपूरचंद बहारे 351,पाटील सुनिल शालिग्राम 319,बाळू आत्माराम पाटील 520 ,पाटील वर्षा गुलाब 464 ,पाटील रेखाबाई राजेंद्र 487, शिवाजी सुकलाल पारधी 367 , माळी वैशाली प्रकाश 333 व गोसावी योगिता भरतगीर या विजयी झाल्यात .
आपले गांव आपले पॅनलच्या हिराबाई अशोक धुडकर 350 , आशाबाई मोतीलाल माळी 300 ,रविद्र प्रताप माळी 393, पाटील माणिकराव हिमत 358 व माळी मालुबाई सुरेश 377 या विजयी झाल्या आहेत.
गावनिहाय विजयी उमेदवार – कंसात विजयी उमेदवारांना मिळालेली मते.
हिंगोणे बू – सरपंच –केदारसिंग कोमलसिंग जाधव (295)विजयी, तानकु बुधा भिल (91), योगिता उदेसिंग भिल (74) ईश्वर चिठ्ठीने, अर्चना महेंद्रसिंग पाटील (98), पंकज भाईदास बहीरम (118 ) निलाबाई प्रताप पाटील (118)
तळवाडे पाटील रामकृष्ण अभिमन (459) वंदना रामकृष्ण पाटील 176 संगीता गुलाब भिल 207
दहिवद खुर्द एका सदस्यपदासाठी जागेसाठी मतदान गोरख सजन पाटील (104)
निसर्डी – सरपंचपदासाठी निवडणूक वैशाली प्रवीण पाटील (350) विजयी
खडके – युवराज शिवन भिल सरपंचपदी (302)विजयी तर सदस्य पदासाठी अनिता नाना भिल ( 91), भिवराज शिवन भिल (99), शितल प्रदीप पाटील (95) सुपाबाई हिरामन पाटील (149)
कुऱ्हे खु – पुनमचंद सुपडु पाटील (149) रावसाहेब मन्साराम धनगर (196) मालुबाई नारायण पाटील 204 कैलास सदाशिव पाटील (193) सुनंदाबाई गुलाब पाटील (172)
लोण सिम वेदश्री सुरेश पाटील (39) गणेश अर्जुन पाटील (51) सुनील गुलाबराव पाटील (99)
लोण बुद्रुक कैलास भगवान पाटील (456) पंकज नारायण पाटील 127 रमणबाई भटू पाटील (122) नाना नथू पाटील (140) दिपाली प्रवीण पाटील (155) कल्याणी रवींद्र पाटील (265) रूपाली जितेंद्र खैरनार (130) कल्पनाबाई नाना पाटील (149)
मालपूर सरपंचपदासाठी सुमनबाई पंढरीनाथ पवार (242) विजयी सचिन भिमराव पवार (121) प्रफुल्ल हिरालाल पाटील (112) जतन बाई दशरथ पाटील ( 89) यशवंत पाटील (103)यासाठी तहसीलदार ज्योती देवरे, नायब तहसिलदार कमलेश जोशी, निवडणूक शाखा कारकून नितीन ढोकणे, संदीप पाटील, जागृती पवार यांनी काम पाहिले