निवडणुकीतील नाका बंदी पथकाच्या कर्मचाऱ्यांना नोटीसा

अमळनेर (प्रतिनिधी) जळगांव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमलेले स्थायी निगराणी पथक (नाका बंदी पथक) जागेवर न आढळून आल्याने सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून त्यांच्या कडून तात्काळ खुलासा मागितला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात बाहेरून येणाऱ्या वाहनांवर तसेच अवैध पैशावर नजर ठेवण्यासाठी धुळे रस्त्यावर चोपडाई कोंढावळ,शिंदखेडा रस्त्यावर,तसेच चोपडा नाक्यावर तीन स्थायी निगराणी पथक (नाका बंदी पथक ) नेमण्यात आले आहेत मात्र पथक जागेवर राहून निगराणी करत नसल्याची तक्रार प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना कळताच त्यांनी गोपनीय चौकशी पथक पाठवले असता धुळे रस्त्यावरील पथक जागेवर आढळून आले नाही म्हणून एक अव्वल कारकून व चार पोलिसांना नोटीसा दिल्या असून तात्काळ खुलासा मागवला असल्याचे प्रांत अहिरे यांनी खबरीलालशी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *