प्रलंबित ज्वलंत वेश्याव्यवसाय स्थानिक नागरिकांसोबत चर्चेप्रश्नी पत्रकारांना मज्जाव
अमळनेर(प्रतिनिधी )येथिल अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मध्यवस्तीतील वेश्यावस्ती हलविणेबाबत मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्त्यांसह चळवळ सुरू केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी सिमा अहिरे यांच्या दालनात सदर विषयावर प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत झालेल्या चर्चेत उपस्थितांनी, अमळनेर येथिल कुंटनखाना व्यवसायाचा त्रास स्थानिक रहिवाश्याना वर्षानुवर्षे मोठ्या प्रमावणावर होत आहे.गुन्हेगारी सह बाहेरगावच्या गिर्हाईकांमुळे होणार त्रास जसे स्थानिक राहिवाश्यांच्या घरात घुसने,गाड्या कुठेही पार्क करणे,भानगडी करणे,मुलींचे विवाह न जुळणे, जुळलेले विवाह तुटणे,अपमानास्पद व हीन भावनेने पाहणे अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अश्या व्यथा मांडल्या. अमळनेर च्या पु.साने गुरुजींची कर्मभूमी, प्रतिपंढरपूर,मंगळग्रह मंदिर, अध्यात्मिक नगरी अश्या लौकिकास यावस्तीमुळे काळिमा फासला जात असल्याची भावना यावेळी झालेल्या बैठकीत रियाज मौलाना,गुलाम नबी, गुलविरसिंग कॉलरा, प्रकाश शहा,अमजद अली ,कुदरत अली,जहुर पठाण यांचे मा.नगरसेवक प्रविण पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी नगरपरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप गायकवाड,अभियंता संजय पाटील यांच्याकडून परिसरातील माहिती जाणून घेतली. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सदरप्रश्नी वेळोवेळी केलेल्या कायदेशीर कारवाईबाबत माहिती देत योग्य त्या वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्यांना कायदेशीरमार्गाने समज देत पोलिस प्रशासन सर्वोतोपरी लक्ष घालेल असे सांगितले. प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी समुपदेशन, आणि संबंधितांना पर्यायी व्यवसायचे प्रशिक्षण देण्याचा पर्याय आदीबाबींचा समावेश करून नियोजनपूर्वक उपाययोजना राबवून सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीवर कायदेशीर कार्यवाही करू असे आश्वासित केले.याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अनिसा तडवी यांनी ही काही व्यवसायिक प्रशिक्षणाचे पर्याय सुचविले. विशेष म्हणजे सदर प्रश्नी मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी यांना जून २०१६, जानेवारी २०१९ ला जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक,उपअधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांनी याबाबत सविस्तर निवेदन दिलेले होते. मा.जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना सदरप्रश्नी संबंधित सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे सांगितले होते.
याप्रसंगी स्थानिक राहिवाश्यांनी व युथ सेवा फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठविल्याने आमच्यावर खोट्या केसेस झाल्याची व जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची आपबीती झालेल्या चर्चेत सांगितली.सदर चळवळ हि सामजिक हिताची चळवळ असून कोणाच्याही वैयक्तिक व राजकीय विरोधासाठी नाही असे याप्रसंगी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनास सांगितले.तर गुन्हेगारी समस्या, बाहेरच्यांचा वावर,परराज्यातील वाहने व माणस यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या परिसरात तातडीने सि. सि. टी. व्ही.कॅमेरे लावण्यात यावेत म्हणून प्राधान्याने कार्यवाही करावी अशी मागणीही रियाज मौलाना, रणजित शिंदे,प्रविण पाटिल यांनी केली. सदर बैठकीत मसूद मिस्तरी,अखतर अली, सैय्यद शराफत अली, नावेद शेख,जाकीर शेख, हाशम अली, कमरअली शहा,रहीम मिस्तरी, शेर खा पठाण,अय्युब मिस्तरी, सुलतान खान, इम्रान खाटीक, जाकीर शाहरुख, हाजी मुझफ्फर अली,जहुर मुतवल्ली, आबिद अली,मुस्तफा प्लंबर, सईद सैलानी ,आरिफ भाई आदिंसह मोठयसंख्येने कार्यकर्ते बैठकीत सहभागी झाले होते.यापुढे सदर समितीत अमळनेरच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, विधी तज्ञ,पत्रकार यांचा समावेश करून चळवळ व्यापक करण्यात येईल असे समितीतर्फे सांगण्यात आले.
मात्र प्रत्यक्ष चर्चेदरम्यान पत्रकारांना बाहेर काढण्यात आल्याने सामाजिक व संवेदनशील विषयात पत्रकारांना लांब ठेवण्याच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले.