सरजू शेठ गोकलानींच्या बंगल्यावर समाजातील विविधरंगी व्यक्तिमत्वांनी लुटला होळी चा आनंद..

अमळनेर( खबरीलाल) संपूर्ण देशभर होळी,रंगपंचमी चा उत्साह सर्वत्र दिसत असतांना अमळनेरलाही तरुण, महिला,नागरिक आणि बालक रंगपंचमी जोशात साजरी करत आहे.

तर अशीच कोरडी होळी रंगपंचमी च्या माध्यमातून साजरी करण्याची परंपरा येथिल सुप्रसिद्ध बहुविध व्यावसायिक आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अजातशत्रू सरजू शेठ गोकलानी यांनी कायम ठेवली आहे.
रंगपंचमी ला पाण्याचा वापर न करता केवळ रंग चेहऱ्याला लावून धुलीवंदनाच्या रंगात संबंधाना उजाळा देण्यासाठी रंगपंचमी चे निमित्त सार्थकी लावण्याची कला अमळनेर येथिल सरजू गोकलानी अनेक वर्षांपासून जोपासत आहेत. अमळनेरच्या सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, व्यापारी,पत्रकारिता क्षेत्रासह विविध प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः गोकलानी हे आमंत्रित करतात. आपल्या घरीच रंगपंचमीचा कार्यक्रम साजरा करण्याची प्रथा यावेळीही कुलागुरू व्यावसायिक समूहाचे प्रवर्तक सरजू गोकलानी यांनी कायम ठेवली आहे.

रंगपंचमी च्या दिवशी आपल्या घरी सकाळी गरमागरम विविध प्रकारच्या गोड, तिखट नाष्टयाची मेजवानी सह चहा ची सोय करण्यात आलेली होती. सोबत रंगबिरंगी रंगाच्या भरलेल्या थाळी टेबलावर सजवून ठेवलेल्या होत्या. येणाऱ्या मान्यवरांना विविध रंगी रंग चेहऱ्यावर लावून गोकलानी हे स्वागत करीत होते.तर सोबत सुरू असलेल्या बहारदार रंगपंचमी च्या गीत संगीतावर येणाऱ्या मान्यवरांचे पाय अलगद ठेका धरत होते.अनेक जेष्ठांनी तरुणांसह यावेळी ठेका धरत नृत्य करून होळीचा जल्लोष केला.
परिवारातील महिलां मुलींसह आलेल्या माहीलांसाठीही स्वतंत्रपणे रंगपंचमी खेळण्याची सोय करण्यात आल्याने उपस्थित महिला,युवतीही मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करतांना आनंदात दिसत होत्या.

याप्रसंगी सरजू शेठ गोकलानी,भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, दामू शेठ गोकलानी, श्याम शेठ गोकलानी, उद्योगपती विनोद भैया पाटील, लालू शेठ सैनानी,युनियन बँकेचे मॅनेजर मयूर पाटील, सुनिल चौधरी, निरज अग्रवाल, जितेंद्र जैन,प्रदीप अग्रवाल, रणजित शिंदे, किरण पाटील, डॉ. मिलिंद नवसारीकर,दिनेश रेजा, सतु शेठ निरंकारी, प्रविण सोनार, भरत ललवाणी, राजू महाले सर,गजू भाऊ विंचूरकर, निकुंभ नाना, आबा निकुंभ, विशाल निकुंभ,असंख्य सिंधी बांधव, सह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

