सचिवपदी डॉ. अनिल देशमुख यांची तर कार्यकारिणीत अमळनेरच्या ॲड. भारती अग्रवाल यांचाही समावेश
अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. खान्देशला प्रथमच मिळाली संधी मिळाली असून सचिवपदी डॉ. अनिल देशमुख यांची तर कार्यकारिणीत अमळनेरच्या ॲड. भारती अग्रवाल यांचा ही समावेश आहे.
मध्य महाराष्ट्र प्रांत सचिवपदी नियुक्ती झाल्याचे राष्ट्रीय प्रांत संपर्क पदाधिकारी सूर्यकांत पाठक यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक सदन पुणे येथे 10 जिल्हा व दोन महानगर यांचे उपस्थित 45 प्रतिनिधी समवेत बैठक झाली. यात राष्ट्रीय क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जळगांव जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांची निवड जाहीर केली आहे. या सोबत प्रांत अध्यक्षपदी बाळासाहेब औटी, प्रांत संघटक म्हणून संदीप जंगम तर कोषध्यक्ष म्हणून विलास जगदाळे यांचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी नंदुरबारच्या वंदना तोरवणे यांची तर प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून अमळनेरच्या माजी तालुका अध्यक्ष अंमळनेर व जिल्हा न्याय विधी समिती प्रमुख, प्रांत महिला आयाम प्रमुख ॲड. भारती अग्रवाल यांचीही प्रांत कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. डॉ. अनिल देशमुख यांनी पाचोरा तालुका अध्यक्ष म्हणून सुरवात करीत सध्या ते विद्यमान जळगाव जिल्हाध्यक्ष असून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य असून धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग तथा ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच मध्यस्थ पॅनल सदस्य म्हणून ही कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांना बरोबर घेत ग्राहक कायदा, ग्राहकांचे हक्क व कर्तव्य, ग्राहक फसवणूक टाळणेसाठी प्रबोधन प्रचार व प्रसार करीत सर्व दूर बँक, सायबर क्राईम, वीज वितरण कंपनी, वैद्यकीय क्षेत्र, परिवहन विभाग व ऑनलाईन फसवणूक झालेल्या असंख्य ग्राहकांची यशस्वी सोडवणूक करून त्यांना न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. कोरोना काळात अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे देशात ऑक्सिजन प्लांटचे व ग्राहक पोर्टल तयार करणारे ते पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे. त्यांचे या खेरीज रोटरी इंटर नॅशनल संस्था, शासन मान्यता प्राप्त राजापत्रित पशुवैद्यकीय क्षेत्र, शिक्षक पालक संघ, अनेक सामाजिक संस्थामध्ये भरीव कामगिरी केली असून आज पर्यंत त्यांना बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया, भारत ज्योती अवॉर्ड, भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट आदर्श अधिकारी, जाणीव सांस्कृतिक अभियान यांचा जाणीव पुरस्कार, अष्टपैलू पशुवैद्यक पुरस्कार असे अनेक राज्य व राष्ट्रीय स्थरावर देऊन त्यांचा कार्याचा व त्यांचा गौरव या पूर्वीच करण्यात आला आहे.
त्यांचे याच सर्वांगीण सामाजिक अष्टपैलू कार्याची व अखिल भारतीय ग्राहक पंचायत मार्फत ग्राहकप्रति निस्वार्थी सामाजिक सेवेची दखल घेत राष्ट्रीय कार्यकारिणीने डॉ. अनिल देशमुख यांची मध्य महाराष्ट्र प्रांत सचिवपदी ही स्तुत्य निवड केली आहे. त्यांचे निवडीचे सर्वच जिल्हास्थारातून व प्रांतातून स्वागत करण्यात येत आहे. विशेषतः प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख व कार्यकारिणी सदस्य ॲड. भारती अग्रवाल यांचे रूपाने मध्यमहाराष्ट्र प्रांत स्थरीय जळगांव जिल्हा व वंदना तोरवणे नंदुरबार जिल्हा एकंदरीत खान्देशच्या भूमिस हा न्याय व स्तुत्य निवड होत हा बहुमान प्रथमच मिळाला आहे.