अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसरे धरणाचा समावेश करून यावर्षी तब्बल ८५९ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल गांधली येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
गांधली येथे महिला ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन तसेच अभ्यासिकेच्या सुसज्जिकरणाचा शुभारंभ खासदार वाघ यांच्या हस्ते पार पडला. ग्रामपंचायत स्तरावर दिला जाणारा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी पंचायत पुरस्कार” गावातील कर्तृत्ववान महिला साधना विजय पाटील, मंगलबाई गोविंदराव पाटील, मंजुषा प्रकाश पाटील तसेच सेवानिवृत्त होणारे किशोर पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात खासदार वाघ यांनी मोदी सरकारच्या यशस्वी ११ वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा दिला. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना, ग्रामीण आणि शेती विकास उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती दिली. सरपंच नरेंद्र पाटील यांनी गांधली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रलंबित प्रस्तावास राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी खासदारांकडे विनंती केली. कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चा राज्य उपाध्यक्षा भैरवी पलांडे, डॉ.अनिल शिंदे, दिनेश नाईक, राहुल पाटील, प्रेमराज पाटील, सुधाकर चव्हाण, महेंद्र पाटील, शिवदास पारधी, अशोक पाटील, राहुल बविस्कर, धनंजय कुलकर्णी, प्रवीण पाटील, सुधाकर साळुंखे, सुनील पाटील, कैलास पाटील, किरण बडगुजर, सुरेश कोळी, नीलकंठ पाटील यांच्यासह असंख्य ग्रामस्थ, महिला, युवा मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सूत्रसंचालन व प्रस्तावना किरण महाजन यांनी केले