🔷 चालू घडामोडी :- 18 जून 2025
◆ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पार पडला.
◆ दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने 27 वर्षानंतर ICC Champions स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ दक्षिण आफ्रिका WTC चॅम्पियन ट्रॉफी जिंकणारा तिसरा देश ठरला आहे.
◆ इटली देशात डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणारी स्पर्धा पार पडली. [या स्पर्धेत महाराष्ट्राचा कुणाल विजयकुमार पाटीलने 30 तास धावला]
◆ 22 जुलै या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करण्यात निर्णय घेतला आहे.
◆ प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना आसाम राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
◆ जागतिक जलतरण साक्षरता दिन 15 जून रोजी साजरा करण्यात आला.
◆ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2023-25 सत्रात पॅट कमिन्स ने सर्वाधिक 80 विकेट घेतल्या आहेत.
◆ इस्राईल देशाविरुद्ध इराण देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस 3 सुरू केले आहे.
◆ ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून क्रिस्तियानो रोनाल्डो ची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्या 10 मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर अतिका मीर ठरली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- खबरीलाल