आचारसंहिता निवडणूकीची मात्र कुणाला कुणाचा मेळ नाय अशी सहाय्यक निवडणूक कार्यालयाची अवस्था….

निवडणूक कार्यालयाकडून माहीती पासून प्रेस मीडिया वंचित

अमळनेर (खबरीलाल ऑनलाईन )आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी अमळनेर उपविभागात सर्वविभाग प्रशासकीय राजकीय विभाग यांच्या बैठका झालेल्या नाहीत. झाल्या असतील तर त्याबाबत मीडियाला माहिती नाही अशी स्थिती आज अमळनेर विभागाची झाली आहे.  

प्रत्येक लोकसभा निवडणुकीत एक आचार संहिता कक्ष स्थापन झालेला असतो. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत बैठका आणि विविध कामासाठी मीडियाला माहिती देत असतात मात्र आचार संहिता सुरू होऊन १० दिवस लोटले पण अमळनेर विभागाचे काय नेमके सुरू आहे. हे गुढच आहे.
लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकारी, कर्मचा-यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाते हे पण झालेले नाही. अशा बैठकीत विविध पक्षांचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी आणि निवडणूक विभागातील कर्मचारी, अधिकारी, पत्रकार उपस्थित असतात. आचारसंहिता कक्षाचे कामकाज, प्रचार कार्यक्रमासाठी परवानगी, त्यासाठीचे नियम, अटी आणि शर्ती या विषयीची माहिती संबंधितांना दिली जाते.

आचारसंहिता कक्ष प्रमुख कोण….?

लोकसभेच्या विधानसभा मतदारसंघासाठी आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात येते. त्याचे कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येते व त्याचा क्रमांक दिला जातो. याखेरीज दक्षता पथक, विशेष तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राजकीय पक्षांना विविध परवाने देण्यासाठी एक खिडकी आणि तक्रार निवारण कक्ष सज्ज झाला आहे. निवडणूक कार्यालयाचा, तसेच रॅली, प्रचार परवाना परवानगीनंतरच द्यावा, आरटीओच्या परवानगीनंतर रॅलीत वाहन वापरण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना कक्षप्रमुखांना येतात. आचार संहिता भंग झाल्यास कारवाई याबाबत देखील माहिती दिली जाते मात्र संबंधित विभागाला मीडियाचे वावडे असल्याचे या निवडणुकीत एकंदरीत दिसून येत आहे. एकही माहिती अद्याप दिलेली नाही. आचार संहिता भंग अथवा हद्दपारी प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत देखील अद्याप काहीएक माहिती नाही हे अमळनेर उपविभागाचे दुर्भाग्य आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *