अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून रक्तदान शिबिरातून 60 रक्त युनिट संकलन

अमळनेर (प्रतिनिधी) युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून रक्तदान शिबीर घेऊन 60 रक्त युनिट संकलन केले.

युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी यांनी सन 1986 पासून सुरू केलेली रक्तदान अभियानाची हि मोहीम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहोचली आहे. मागील 4 दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 8644 शिबिरांमध्ये मिशन मार्फत 14,05,177 युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले. संत निरंकारी मिशनमध्ये दरवर्षी 24 एप्रिलपासून महा रक्तदान शिबीरास आरंभ होत असतो. आज जवळपास संपूर्ण देशात 500 पेक्षा अधिक शाखांमध्ये जवळपास 50,000 पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करून निस्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतात. दि. 14 जून वार शनिवार रोजी रक्तदान शिबिर जनजागृती साठी अमळनेर शहरात विशाल मोटर सायकल रॅलीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. याचाच भाग म्हणून संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा अमळनेर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील धुळे झोन 36-बी अंतर्गत हिरालाल पाटील, झोनल ईंचार्ज धुळे झोन ३६-बी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सत्संग भवन, चोपडा रोड सिंधी कॉलनी अमळनेर येथे दि १५ जून रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उदघाटन प्रसंगी हिरालाल पाटील यांच्यासह अमळनेर परीसरातील ग्रामीण भागातील सर्व साध संगत व स्थानिक साध संगत उपस्थित होते. अमळनेर ब्रांचचे सेवादल इंचार्ज  जितेंद्र डिंगराई यांनी आलेले अतिथींचे स्वागत व सत्कार करत संत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले. तसेच रक्त संकलनासाठी जळगाव येथील रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉक्टर्स व सर्व  कर्मचारी उपस्थित होते.

या विशाल भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी चहा-पाणी, फळफळावळ, अल्पोपहार, जेवनाची उचित व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीपणासाठी अमळनेर ब्रांचचे मुखी श्रीचंद  निरंकारी  यांच्या सह सर्व साध संगत, सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *