बुरा ना मानो होली है….

घरकुल की हवा रास आयी,
हाथ से आमदार की तो गयी फिर भी….
खासदार की के लिये आवाज आयी,
यही तो है जेल की सही कमाई.!

ओळखा कोण…?

किती ही करा कटकटी नाव माझे ए.टी.,
एक दशक कमळासंगे वाजवली शिटी…
खाई त्याला खवखवे तसा मी पण नटखटी,
तिकीट मलाच मिळेल किती ही मारा तुम्ही खुटी.!

ओळखा कोण…?

न.पा.च्या माध्यमातून आजोळी आलो,
‘धन’ ‘धन’ सतगुरु म्हणत आमदार झालो…
नवलाईच्या मधुचंद्राचे दिवस संपताच
न.पा.तं अभद्र युती ने पराभूत झालो.!

ओळखा कोण…?

स्मितातून चांदणे निथळावे, उदयाला सत्तेचे स्वप्न पडावे,
“एकनाथी”हात सोडता “गिरीषानेही” दूर पडावे.!

ओळखा कोण…?

गांव माझे हिंगोणे खूप गायले भाजपचे गाणे,
सत्ता सोपानासाठी भटकलो दिनवाणे…
अखेर सत्तेसाठी मनगटी, बांधले घड्याळाचे तुणतुणे.!

ओळखा कोण…?

राजवडच्या खोडाने ‘भूषण’ म्हणून मिरवलं,
आमदारकी जाताच न.पा.त कमळ फुलवलं.!

ओळखा कोण…?

गल्लीत खलबते करता करता,
स्वयंघोषित झाले दलित नेता…
चळवळीला सुरुंग लावून आण्णा,
कसा आर.एस.एसी.घोटा पचविना..!

ओळखा कोण…?

काय कुणास मागावे काय देणारा देईन,
वापरून राजकीय बळ संस्थेचे भलं करीन…
नका समजू आश्वासनांची खैरात तुम्ही धुरीण,
२०२० मध्ये पत्रकार भवन साकार करीन.!

ओळखा कोण…?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *