टाकरखेडा येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील एका तरुणाने अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना १५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
टाकरखेडा येथील एक अल्पवयीन मुलगी १४ रोजी सायंकाळी ७ वाजता तिच्या मावशी आशाबाई कडे झोपायला गेली होती १५ रोजी सकाळी तिचे आईवडील शेतात मजुरीसाठी गेले होते सायंकाळी ते शेतातून परत आल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी दिसली नाही तेव्हा त्यांना ती १५ रोजी दुपारी अमळनेर गेली होती असे सांगण्यात आले ती परत आली नाही म्हणून तिची शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही तिला अधून मधून भेटणारा पारोळा तालुक्यातील दादाभाऊ भिल पूर्ण नाव माहीत नाही याने पळवून नेल्याची खात्री झाली म्हणून त्यांनी दादाभाऊ विरुद्ध भादवी ३६३ , ३६६ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *