अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्याची तरुणीला वेळोवेळी मरून जाण्याची धमकी देऊन तिचे चोरून काढलेले फोटो भ्रमणध्वनिवरून व्हायरल करून बदनामी करणाऱ्या जळगाव मु.जे. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यावर विनयभंगचा व माहिती तंत्रज्ञान कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रावेर येथील रहिवासी असलेला व जळगाव येथील मु जे महाविद्यालयाच्या वस्तीगृहात राहणारा राहुल बारकू बारेला याने अमळनेर तालुक्याच्या एक 23 वर्षीय तरुणीला 1 जानेवारी 2019 ते 18 मार्च 2019 दरम्यान अमळनेर बसस्थानक व शहरातील विविध भागात मरून जाण्याची धमकी दिली तसेच शिवाजी बगिच्यात तिची ओढणी ओढून विनयभंग केला आणि तिचे चोरून काढलेले फोटो स्वतःच्या भ्रमणध्वनिवरून पीडित तरुणीच्या व तिच्या मैत्रिणीच्या भ्रमणध्वनीवर व्हायरल करून बदनामी केली तरुणीने 20 रोजी अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून राहुल बारेला विरुद्ध भादवी 354 , व 354 ड प्रमाणे विनयभंग , 323 प्रमाणे मारहाण 506 प्रमाणे धमकी व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.