स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

🔷 चालू घडामोडी :- 10 जून 2025

 

◆ 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा(MH) मध्ये होणार आहे.

 

◆ स्पेनच्या कार्लोस अल्काराझने इटलीच्या यानिक सिनरवर मात करून, फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

 

◆ पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने फ्रान्समध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेत (UNOC) भाग घेतला.

 

◆ केंद्रीय गृहमंत्र्यांनी प्रशासनात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय भाषा विभाग (BBA) सुरू केला.

 

◆ परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे चौथी भारत-मध्य आशिया संवाद आयोजित करण्यात आली.

 

◆ तत्वज्ञानी आणि लेखक आचार्य प्रशांत यांना जागतिक पर्यावरण दिन 2025 रोजी ‘सर्वात प्रभावी पर्यावरणवादी’ पुरस्कार मिळाला.

 

◆ भारतीय निवडणूक आयोग संस्थेने निवडणुकांसाठी तंत्रज्ञानावर आधारित इंडेक्स कार्ड प्रणाली सुरू केली आहे.

 

◆ भारतात शहरी ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण (UCCS) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) संस्था करते.

 

◆ राष्ट्रीय ई-विधान Application (NeVA) हा संसदीय कामकाज मंत्रालयाने सुरू केलेला एक डिजिटल उपक्रम आहे.

 

◆ 2026 मध्ये 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचाचे आयोजन भारत देश करेल.

 

◆ तामिळनाडू राज्यात अलीकडेच पांडव काळातील 800 वर्षे जुने शिवमंदिर सापडले आहे.

 

◆ IIT खरगपूरने ‘डायनॅमिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मोबिलिटी (DRUM)’ हे वेब App विकसित केले आहे.

 

◆ भारतीय मध्यस्थता परिषद (ICA) संस्थेने “भारत-यूके व्यावसायिक वादांचे मध्यस्थी” या विषयावर तिसरे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *