जलजागर जलसंधारण स्पर्धेत अमळनेर तालुक्याने मिळवले पहिले तिन्ही बक्षीसे

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाच्या जलजागर जलसंधारण स्पर्धेत संस्था गटात तालुक्यातील पिंपळे येथील धरती माता बचत  गटाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे. तर वैयक्तिक गटात जिल्ह्यात पहिले तिन्ही बक्षिसे अमळनेर तालुक्याने मिळवली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शासनाने ग्रामीण भागात सिंचनक्षमता वाढवण्यासाठी पाझर तलाव पुनर्भरण, जलतारा, पावसाचे पाणी साठवणे, गाळ काढणे, बंधारा बांधणे याबाबत संस्था गटात आणि वैयक्तिक गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्था गटात जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील खिरोदा ग्रामपंचायतीने बंधारा बांधला असून त्यांचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथील धरती माता बचत गटाचा द्वितीय क्रमांक आला आहे. या  बचत गटाने पाणी फौंडेशनच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, मारवड विकास मंच यांच्या मदतीने गावात योग्य जागा निवडून नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण, जलतारा खड्डे बनवले भूस्तर आणि पाण्याचा  निचरा चांगला असे  उत्कृष्ट काम केले. तिसरा क्रमांक केशव स्मृती प्रतिष्ठांन ला मिळाला आहे. त्यांनी वनराई बंधारा बांधला आहे.   त्याचप्रमाणे वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक अमळनेर तालुक्यातील म्हसले येथील भीमा दौलत शिरसाठ याना मिळाला असून त्यांनी उत्कृष्ट  जलतारा व पुनर्भरण खड्डा तयार केला. दुसरा क्रमांक पिंपळे येथील रवींद्र एकनाथ पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी जलतारा आणि पुनर्भरण खड्डा तयार केला आहे. तर तिसरा क्रमांक प्रमिलाबाई पुंडलिक पाटील रा सडावण याना वैयक्तिक शेततळे बनवंल्याबद्दल तिसरा क्रमांक मिळाला आहे.

रवि ज्वेलर्स अमळनेर

24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *