
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे प्रि प्रायमरी विभागातील सिनियर के.जी च्या विद्यार्थ्यांचा दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सिनी.के जी प्रि प्रायमरि विभागातुन इ १ ली प्रायमरी विभागात यशस्वी पदार्पणासाठी काॅन्होकेशन कॅप व प्रमाणपत्र देऊन प्राचार्य विकास चौधरी व प्रशासन अधिकारी अमोल माळी यांच्या हस्ते गौरवण्यात आले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत हा अनोखा सोहळा त्यांना खास आकर्षण ठरत होता. त्यांच्या चेहर्यावरील आनंद त्यांच्यात आत्मविश्र्वास निर्माण करणारा होता.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेत नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.सुत्रसंचालन भारती ढोले यांनी केले तर आभार आशा पवार यांनी मानले.