जानवे येथे अंगणवाडी परिसरातच गुरे बांधून तयार केला गुरांचा गोठा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथे अंगणवाडीच्या परिसरात व शॉपिंग सेंटर लगतच नागरिक गुरे बांधत आहेत. त्यामुळे  मुलांच्या आरोग्यास आणि जिवास धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार जानवे येथील शरद साहेबराब पाटील यांनी केली आहे.

शरद पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की,  ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीलगत गुरे बांधली जात असल्याने आरोग्यावर परिणाम होऊन इमारत देखील खराब होत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे शरद पाटील यांनी म्हटले आहे. याबाबत ग्रामसेवक हितेंद्र कोतवाल यांनी म्हटले आहे की, संबंधित गुरे बांधणाऱ्या लोकांना नोटिसा दिल्या असून त्यांनी यापुढे गुरे बांधणार नाही, असे लेखी दिले आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागी गुरे बांधणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

 

रवि ज्वेलर्स अमळनेर

 

24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.

22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.

18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.

 

शुद्ध चांदी 999%        :    ₹. 1005/-

 

भाव प्रती 10 ग्राम

 

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *