अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव परिमंडळांतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे नागरिकांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे.
या कार्यक्रमास जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता इब्राहीम ए. मुलाणी उपस्थित होते. ३३६.७६ लक्ष रुपयांच्या खर्चातून उभारलेले आधुनिक उपकेंद्र आमदार अनिल पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील वीजवाटप व्यवस्था अधिक सक्षम, विश्वासार्ह व कार्यक्षम झाली आहे. याशिवाय शेळावे व परिसरातील गावांसाठी हे उपकेंद्र एक महत्त्वाचा वीजपुरवठा केंद्रबिंदू ठरणार आहे. नियमित वीजपुरवठ्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा याठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उद्घाटन प्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी संपूर्ण उपकेंद्राची स्वतः पाहणी करून संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यांनी मुख्य अभियंता व इतर तांत्रिक अधिकाऱ्यांकडून उपकेंद्राची कार्यपद्धती, क्षमता, तांत्रिक वैशिष्ट्ये, वीजवाटप व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती घेतली. दरम्यान मनोगत व्यक्त करताना आमदार पाटील यांनी या उपकेंद्रामार्फत परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी महावितरणच्या अभियंत्यांनी वेळेवर व दर्जेदार काम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले व अशाच प्रकारची कार्यशैली भविष्यातही टिकवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदारांनी व्यक्त केलेल्या भावना व विचारांनी कार्यक्रमाला अधिक प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले. उपकेंद्राच्या उद्घाटनाने केवळ वीजप्रवाह सुरू झाला नसून, एक विकासप्रवाहाला दिशा मिळाली आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या नव्या उपकेंद्रामुळे असा होणार लाभ
सद्यस्थितीतील भारवाढ नियंत्रणात येणार, दबावातील चढ-उताराचे प्रमाण कमी होणार, वीजपुरवठ्यातील खंडिततेत लक्षणीय घट होणार आहे. औद्योगिक, कृषी व घरेलू ग्राहकांना अधिक विश्वासार्ह व स्थिर वीज मिळणार.
रवि ज्वेलर्स अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%