अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 2 जून रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन अरुण सुतार (वय९), हरीश बाळू पाटील (वय१२) अशी मृत मुलांची नावे असून चेतन अरुण सुतार ह्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. तो शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर दुसरा मृतदेह शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दोघेही मुले खेळायला गेले असतील यामुळे सायंकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता चेतन सुतार हा पाण्यात तरंगताना दिसला. दोघे पोहण्यासाठी गेले असताना काठावर कपडे काढून पोहत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे गावात सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, फिरोज बागवान, संजय पाटील, अगोने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहे.
रवि ज्वेलर्स अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%