अमळनेर (प्रतिनिधी) भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची जयंती तांबेपुरा भागात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
माजी शहराध्यक्ष विजय राजपूत यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ, डॉ. अनिल शिंदे, जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी जि. प. सदस्य संदिप पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, राकेश पाटील, सागर वाघ, दिपक पवार, सदाशिव पाटील, गजानन पाटील, महेंद्र पाटील, अविनाश पाटील, निखिल पाटील, समाधान पाटील, अरमान पिंजारी, किशोर देसले, रूपेश मिस्तरी, लोकेश पाटील,गौरव सोनार, रवि ठाकूर, सागर शेटे, राज माॅडल आदी उपस्थित होते. यावेळी उदय बापुंचा आठवणींचा उजाळा करण्यात आला, समस्त जळगाव जिल्ह्यात संघटन मजबूत करुन आपली छाप कामाचा माध्यमातून उमटवली. आज देखील संघटनेत काम करतांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करायला आवडेल, असे डॉ. चौधरी यांनी बोलले. बापू म्हणजे कार्यकर्ते घडवणारी चालती फिरती कार्य शाळा होती. आम्ही त्यांच्या सानिध्यात राहीलो भले थोड्या काळासाठी पण त्यांची शिकवण पक्ष प्रेम व निष्ठा कार्यकरर्त्यांना जीव लावणे हे तत्त्व पालन करण्या जोगे आहे, असे प्रतिपादन माजी शहराध्यक्ष विजय राजपूत यांनी केले.
रवि ज्वेलर्स अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%