🔷 चालू घडामोडी :- 02 जून 2025
◆ दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. [2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.]
◆ जागतिक दूध दिवस 2025 ची थीम “दुधाच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करूया” आहे.
◆ जागतिक दूध दिवस 2024 ची थीम “दुग्धजन्य पदार्थ: जगभरातील पौष्टिक अन्नाचा एक भाग” (Milk: A Part of a Healthy Global Diet) होती.
◆ ग्लोबल फॉरेस्ट वॉच (GFW) अहवाल “वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI)” संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो.
◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या संस्थेने उदारीकृत रेमिटन्स योजना (LRS) सुरू केली.
◆ 2025 ची मत्स्यव्यवसाय सचिव परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ भारतातील सर्वात मोठ्या एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम आणि सुपरअॅलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन लखनौ येथे झाले.
◆ भारत सेवा केंद्र (BSK) हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (CCI इंडिया) ने सुरू केलेला एक राष्ट्रीय उपक्रम आहे.
◆ तियानवेन-2 मोहीम “चीन राष्ट्रीय अंतराळ प्रशासन (CNSA)” या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे.
◆ आसाममधील विश्वनाथ जिल्ह्यातील नागशंकर मंदिराची कासव संवर्धनासाठी एक आदर्श मंदिर म्हणून निवड करण्यात आली आहे.
◆ “ओरन” हे भारतातील राजस्थान राज्यात आढळणारे पारंपारिक पवित्र वनक्षेत्र आहे.
◆ नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचा विषय “विकसित भारतासाठी विकसित राज्य @2047” होता.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.
◆ सौदी अरेबियाने TOURISE नावाचे एक जागतिक व्यासपीठ सुरू केले आहे.
◆ किरू जलविद्युत प्रकल्प (KHPP) जम्मू आणि काश्मीर राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे.
◆ जागतिक स्तरावर महत्त्वाच्या कृषी वारसा प्रणाली (GIAHS) “अन्न आणि कृषी संघटना (FAO)” संस्थेने सुरू केल्या.
◆ जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने (WOAH) पहिला जागतिक प्राणी आरोग्य अहवाल प्रसिद्ध केला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- खबरीलाल
रवि ज्वेलर्स अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%