अमळनेर (प्रतिनिधी) लोकमाता, पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांची जयंती या वर्षी त्रिशताब्दी वर्ष संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जात आहे. यनिमित्ताने शाळा, सामाजिक संस्थांनातर्फे विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.
ताडेपुरा सुबक प्रतिमा स्थापन
ताडेपुरा येथील नागरीकांनी मोठी सुबक प्रतिमा स्थापन करून लोकमाता, पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांना अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ते धनराज धनगर, धनराज चिंचोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे उदघाटन झाले. भाजप उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन केले. या वेळी ताडेपुरा येथील समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते.
अमळनेर भाजपतर्फे विविध कार्यक्रम
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अमळनेर भाजपच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता बसस्थानकाजवळील राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मारकस्थळी अभिवादन करताना राजमातांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यानंतर समाजहिताच्या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली व रक्तदानाच्या माध्यमातून राजमातांच्या “जनसेवेचा आदर्श” प्रत्यक्षात उतरवण्यात आला. दुपारी कपिलेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. हे मंदिर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या प्रयत्नातून जीर्णोद्धार करून बांधलेले असल्यामुळे या स्थळाला विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. मंदिरात झालेली महाआरती, मंत्रोच्चार आणि भक्तिगीतांमुळे परिसर पावन झाला. या कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ स्मृती जागवणं नव्हे तर राजमातांच्या आदर्शांचे नव्या पिढीपर्यंत प्रसारण करणे हा भाजप अमळनेरचा उद्देश होता. कार्यक्रमात भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, खानदेश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन डॉ.अनिल शिंदे, ओबीसी मोर्चा प्रदेश भारती सोनवणे, जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडल अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,माजी नगरसेवक श्याम पाटील,पांडुरंग महाजन, विक्रांत पाटील, माजी शहर अध्यक्ष हरचंद लांडगे, खाशी संचालक माधुरी पाटील, अर्बन संचालिका वसुंधरा लांडगे,स्वपना पाटील, स्नेहा ऐकतारे, निळकंठ तात्या, सरचिटणीस राकेश पाटील, राहुल पाटील, रणजित पाटील, डी. ए. धनगर, मगन भाऊसाहेब, दिनेश माळी, विजय बाविस्कर, युवा मोर्चा देवा लांडगे, राहुल चौधरी, समाधान पाटील, कल्पेश पाटील, रितेश सोनवणे, हिरालाल पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील, प्रवीण पाटील, निखिल धनगर,अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, अनिरुद्ध शिसोदे, अक्षय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
साने गुरुजी विद्या मंदिर
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी विद्या मंदिरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 31 मे रोजी सेवानिवृत्त होणारे ज्येष्ठ शिक्षिका हेमलता धाकड आणि ज्येष्ठ शिक्षक डी. के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे यांच्या सह संस्थेच्या तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक धाकड यांचे चिरंजीव वैभव धाकड, आणि डी के पाटील यांच्या सुविद्य पत्नी सुलोचना पाटील, शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन महेंद्र रत्नपारखी यांनी केले.
अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम साने गुरुजी विद्या मंदिरात घेण्यात आला.काँग्रेसचे मोजके कार्यकर्ते एकत्र येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट, इतिहास, त्यांनी केलेले कार्य, त्यांची प्रगल्भ विचारसरणी, याविषयी चर्चा झाली. त्यात अहिल्यादेवी होळकरांची भगवान शंकरावरची श्रद्धा, त्यामुळे त्यांनी कुशावर्त धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचा केलेला जिर्णोद्धार, हुंडा प्रथेला विरोध, विधवांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार, पशुपक्ष्यांना, माशांना (मासे) अन्न पुरण्यावरून, त्यांच्या भूतदयावर चर्चा झाली. अशा चर्चेत काँग्रेस तालुका अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, प्रा. श्याम पवार, सुलोचना ताई वाघ, संदीप घोरपडे, प्रताप नगराज पाटील, गजेंद्र साळुंखे, राजेंद्र चौधरी सर, शरद नाना पाटील, के.व्हि.नाना पाटील, राजू भाट, शालिग्राम पाटील, लोटन मोतीराम पाटील, इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. व शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा पूजन करून, त्यांना मानाचा मुजरा देत कार्यक्रमाची सांगता झाली.
रवि ज्वेलर्स अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%