अमळनेर तालुक्यातील 68 हजार 975 लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षाच !

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील 68 हजार 975  लाडक्या बहिणींना मे महिना अखेरही 11वा हप्ता मिळालेला नाही. हा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. तसेच मेचा हप्ता व वाढीव सहाशे रुपयाची रक्कम कधी मिळणार? अशी विचारणा लाडक्या बहिणी करीत आहेत. मात्र तालुका बालविकास प्रकल्प कार्यालयही या हप्त्याविषयी अनभिज्ञ आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील विधवा, परित्यक्त्या, निराधार,विवाहित महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै 2024 महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभार्थी महिलांना लाभ मिळत आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण दहा हप्त्यांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर,ऑक्टोबर,नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या कालावधीमधील एकूण दहा हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. शासनाकडून एका लाडक्या बहिणीला जुलै महिन्यापासून ते एप्रिल पर्यंत 15 हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे. लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. मे महिन्याचा लाभ कधी मिळणार तसेच महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊन सहा महिने होऊन देखील सहाशे रुपये वाढीव रक्कमेचा आश्वासन दिलेला हप्ता कधी मिळणार? असे प्रश्न योजनेच्या लाभार्थी महिलांकडून  उपस्थित होत आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकाच वेळी दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे विचारणा केली असता लाडक्या बहिणीचे हप्ते शासनस्तरावरून जमा होत आहेत. त्यामुळे मे महिन्याचा 11वा हप्ता कधी जमा होईल. हे अद्याप कळवण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

लाडक्या बहिणीचे हप्ते शासनस्तरावरून होतात जमा

 

तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंतचा 10 हप्त्याचा 15 हजार रुपयांचा लाभ महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. लाडक्या बहिणीचे हप्ते शासनस्तरावरून जमा होत असतात.

 –प्रेमलता पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, अमळनेर

 

लाडक्या बहिणींना 2100च्या हप्त्याची प्रतीक्षा

 

महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन सहा महिने होऊन देखील लाडक्या बहिणींना 2100च्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. महायुतीने निवडणुकीच्या काळात आम्हा महिलांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सहा महिने होऊन देखील न करणे म्हणजे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची एक प्रकारची फसवणूक आहे. तरी महायुती सरकारने आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी. ही अपेक्षा

  – सुषमा हेमंत चौधरी, लाभार्थी महिला,अमळनेर 

 

रवि ज्वेलर्स अमळनेर

 

24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.

22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.

18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.

 

शुद्ध चांदी 999%        :    ₹. 1000/-

 

भाव प्रती 10 ग्राम

 

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *