खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर आयोजित मतदान जनजागृती अभियानाला सुरुवात

अमळनेर(प्रतिनिधी) अभाविप अमळनेर शाखेच्या वतीने संपूर्ण अमळनेर जिल्ह्यत हे मतदान जनजागृती अभियान राबवणार आहे हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभाविपकडून राबवला जात आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद समाजातील विविध विषय घेऊन समाजाला जागृत करण्यासाठी हे अभियान राबवत आहे या अभियानामध्ये स्वयं रोजगार व उद्योजकता वाढीसाठी, सामाजिक समरसतेसाठी,लोकशाही बळकट करण्यासाठी,महिला सुरक्षेसाठी,राष्ट्रीय सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी,भ्रष्टाचार संपवण्यासाठी,संशोधन वाढवण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व समाजाने मतदान केले पाहिजे असे विद्यार्थी परिषद ला वाटते विद्यार्थी परिषद Dont Press NOTA विषयांमध्ये समाजात जनजागृती करत आहे NOTA हा पर्याय नसून त्यातील योग्य माणसाला मतदान केले पाहिजे असे समाजामध्ये जागरुकता निर्माण करत आहे आगामी काळात लोकसभा निवडणुका संपन्न होणार आहेत तरी यामध्ये आपण 100% मतदान करू व आपले कर्तव्य पार पाडून आपली लोकशाही बळकट करूया असे आव्हान विद्यार्थी परिषद करत आहे संपूर्ण अमळनेर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व गावांमध्ये हे अभियान राबवत आहे या अभियानामध्ये कॉलेजचे विद्यार्थी,प्राध्यापक समाजातील सर्व वर्गापर्यंत आपण जात आहोत भारताला सशक्त व वैभवशाली करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे या अगोदर पण 2014 साली विद्यार्थी परिषदेने नवमतदार नोंदनि व जनजागृती अभियान केल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला होता त्याचप्रमाणे याही वर्षी अभाविपच्या वतीने 100%मतदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत तरी या अभियानाची सुरुवात अमळनेर तालुक्यातील प्रताप कॉलेजपासून सुरुवात करण्यात आली या मतदान जनजागृतीच्या अभियानाचे उदघाटन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य ज्योती राणे,प्रा.धीरज वैष्णव ,केशव पाटील , मतदान जनजागृती अभियान अमळनेर जिल्हा प्रमुख केशव पाटील , अभावीप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वाती पाटील , अभाविप अमळनेर शहर सहमंत्री अभिषेक पाटील ,प्रताप ज्युनिअर कॉलेज उपाध्यक्ष , यांनी केले. यावेळी ममता भोई ,नेहा मोरे ,हर्षदा पाटील , प्रकाश पारधी ,करण वानखेडे , अमर मिटकरी व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button