
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ शाखा अमळनेर मार्फत अमळनेर शहरातील सगळ्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतील शिक्षकांचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पगार खाते उघडण्यासाठी शनिवारी साने गुरुजी विद्या मंदिर या शाळेत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शहरातील सर्व खाजगी प्राथमिक शाळेचे कर्मचारी उपस्थित होते त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेश कुंभार आणि बँकेचे कर्मचारी किरण कचरे, सचिन बिडकर, नवीन रेवतकर, रजनीकांत पाटील आदींनी बँकेत खाते उघडण्याचे फायदे आणि इतर सुविधा विषयी माहिती दिली. यावेळी महासंघाचे तालुकाध्यक्षआशिष पवार, हितेश पाटील, महेंद्र रामोशे, मनोज पाटील, स्वपना पाटील, संजीव पाटील, नरेंद्र अहिरराव, सूर्यवंशी, ठाकरे, शिरसाठ, बडगुजर, फायज आदी उपस्थित होते.