
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर सासऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्यावरून आत्महत्या सासऱ्यासह तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती दीपक प्रल्हाद सोनवणे याला अटक करण्यात आली आहे.
आर के नगर भागातील भावना दीपक पाटील वय ३२ या महिलेने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेपुर्वी स्वतःच्या राहत्या घरी छताला बांधलेल्या झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली जितेंद्र साहेबराव पवार यांनी अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र याबाबत पोलिसात मयत भावना हिचा भाऊ नरेंद्र संभाजी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून याबाबत मयत भावना हिचे सासरे प्रल्हाद उत्तम पाटील हे सुनेकडे शरीरसुखाची मागणी करत असत त्यामुळे कंटाळून भावना हिने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत आधीच पती दीपक प्रल्हाद पाटील यांस अटक करण्यात आली आहे. तर सासरे प्रल्हाद उत्तम पाटील सासू प्रमिलाबाई प्रल्हाद पाटील, नणंद लीना भटू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र संभाजी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पतीसह चार जणांवर भादंवि कलम 306, 34, 354, 498 अ, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपी सासू सासरे नणंद हे तीन जण फरार झाले आहेत. याबाबत पुढील तपास ए.पी. आय. प्रकाश सदगीर व पो.हे.काँ.प्रभाकर पाटील हे करीत आहेत.