
अमळनेर : (प्रतिनिधी) माझ्याकडे का पाहतो या कारणाने तिघांनी एकाला जबरदस्त मारहाण करून दात पडल्याची घटना हशमजी प्रेमजी मार्केट मध्ये घडली
स्वप्नील ईश्वर जाधव रा तांबेपुरा हा हशमजी मार्केट मध्ये रसवंतीवर रस पित असताना त्याने पाहिले म्हणून तेथील बाळा अरुण संदानशीव , हर्ष हिम्मत संदानशीव , व प्रेम नावाचा तरुण रा.आय यु डी पी कॉलनी , जपान जीन यांनी शिवीगाळ मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली बाळा याने स्वप्नील च्या तोंडावर बुक्का मारून दात पाडला स्वप्नील च्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनल भादवी 325 , 323 , 504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे करीत आहेत