
अमळनेर येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे शैक्षणिक वर्ष 2018-19 मधे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.यामधे नृत्य स्पर्धा,हिंदी काव्यवाचन स्पर्धा,वार्षिक क्रिडा महोत्सव,गीतगायन स्पर्धा,निबंधलेखन,वकृत्व स्पर्धा यांसह विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आलेले होता. अॅड ललिता पाटील स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पुस्तकी ज्ञानासोबतच अभ्यासक्रमा व्यतिरीक्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी मदत होत असते. या सर्व स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यामधे प्रथम,द्वितीय,तृतीय येणार्या विद्यार्थ्यांला सुवर्ण,रजत आणि कास्य पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक पराग पाटील,प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी यांच्या हस्ते सुमारे दिडशे विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी मंगला चौधरी,भारती ढोले,आशा पवार,सपना बोरसे आदि उपस्थित होते.