पाडळसे धरणाच्या बैठकीला आज दांडी मारणाऱ्या पुढाऱ्यांकडे सहा तालुक्यांचे लक्ष….

अमळनेर(प्रतिनिधी ) तालुक्यातील पाडळसे धरण युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे या मागणीसाठी जनआंदोलन संघर्ष समितीनी आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबित आंदोलन व्यापक करण्यासाठी आता अमळनेर,धुळे, पारोळा, चोपडा,धरणगाव,शिंदखेडा या ६ तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधिंची महत्वपूर्ण बैठक अमळनेर येथे १० मार्च दुपारी ३ वाजता बोलविली आहे. लोकप्रतिनिधिच्या सामूहिक प्रयत्नांची सोबत घेऊन आंदोलनाची पुढिल दिशा या बैठकीत ठरविली जाईल.
अमळनेर येथिल जुना टाऊन हॉल येथे दुपारी अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, धुळे, शिंदखेडा या तालुक्यातील आजी माजी आमदार,खासदार,आजी माजी मंत्री यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. समितीने धरणाच्या कामाबाबत सतत परिसरात चार वर्षांपासून दुष्काळ पडत असतांनाही शासनाच्या उदासिन दृष्टिकोनामुळे धरणाचे काम रखडलेले आहे.त्यामुळे जळगांव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील जनतेचे होणारे अपरिमित नुकसान झालेले आहे.म्हणून या परिसरात संजीवनी ठरणाऱ्या पाडाळसे धरण पूर्ण होण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. जनआंदोलन समितीने २००८ पासून धरणाची निकड लक्षात घेता रखडलेल्या धरणाचे काम युद्धपातळीवर व्हावे म्हणून सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे.जनतेचा एक दबावगट म्हणून आंदोलनाने मुकमोर्चा, भिकमांगो आंदोलन, साखळी उपोषण,जेलभरो आंदोलन यशस्वी केले. नुकतेच पाडळसे धरणावरच दिवसभर जलसत्याग्रह करून आंदोलनाची तिव्रता वाढवित नेली आहे.एकंदरीत या आंदोलनाची व्याप्ती साखळी उपोषणाच्या माध्यमातून सहाही तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे हजेरी लावत प्रश्नाचे गांभिर्य लोकप्रतिनिधींच्या लक्षात आनून दिली आहे.त्यामुळे जनआंदोलन समितीनेही या प्रश्नात लोकप्रतिनिधिंचे मार्गदर्शक सूचना व सक्रिय सहभाग मिळविण्यासाठी जनतेच्या प्रश्नावर निस्वार्थ उभारलेला लढा व्यापक करण्याचा मार्ग अवलंबिला आहे.सहा तालुक्यातील जनतेसाठी जनआंदोलन समितीने सुरू केलेल्या प्रयत्नाना कोणते लोकप्रतिनिधी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल. एकंदरीत सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष , दुष्काळाची तिव्रता चौफेर वाढली असतांना लोकप्रतिनिधी राजकारण सोडून किती तळमळीने धरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हजेरी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Tags: 6119611961196119611961196119611961196119611961196119611961196119611961196119611961196119611961196119611961196119

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *