समाजात महिलांना योग्य सन्मानाची गरज – प्रा.डॉ माधुरी भांडारकर

अमळनेर प्रतिनिधी- ज्या काळात महिलांवर अनेक बंदी घातली जात होती साधारणता घरातून बाहेर पडण्यासाठी देखील पुरुषांची परवानगी घ्यावी लागायची त्या काळात या भारताच्या पहिल्या महिला पायलट झाल्या. आपल्या देशात महिलांना स्वतंत्र मिळण्याची गरज आहे आजही अनेक महिला असुरक्षित आहेत महिलांवर अनेक अन्याय व अत्याचार होताना दिसतात . फक्त महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करणे उचित होणार नाही ज्या घरात प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने महिलेला सन्मान प्राप्त होईल. आज वाचनालयाच्या माध्यमातून आमचा येत येथोचीत सत्कार व सन्मान केला त्यामुळे मी मनापासून आभार मानते.
महिलांची शारीरिक सुदृढता ही सशक्त समाजाचे लक्षण मानले तर आजमितीस त्यांच्या आरोग्याची हेळसांड जास्त होते दुर्दैवाने कुटुंबात देखील याविषयी चालढकल केली जाते म्हणून महीलांची आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाची असते असे सात पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान या कार्यक्रमात पूजे सानेगुरुजी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ.माधुरी भांडारकर बोलत होत्या.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते प्रमुख अतिथी ज्योतिर्मयी बाविस्कर चिटणीस प्रकाश वाघ, विश्वस्त बापू नागावकर ग्रंथालयाच्या कर्मचारी धारकर मॅडम होत्या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले ,इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली.
जागतिक महिला दिनानिमित्त प्रा. डॉ माधुरी भांडारकर उपक्रमशील शिक्षिका ज्योतिर्मयी बाविस्कर वाचनालयाच्या कर्मचारी धाडकर मॅडम यांचा यथोचित सन्मान शाल व बुके देऊन व्यासपीठावरील मान्यवरांनी केला.
सत्काराला उत्तर देताना ज्योतिर्मयी बाविस्कर म्हणाल्या की कोणती फळाची अपेक्षा न करता कार्य करीत रहा सन्मान होतोच आज महिला दिनानिमित्ताने माझा गीत सूचित सन्मान केल्याबद्दल वाटण्याच्या विश्वस्त मंडळाचे मनस्वी आभार मानते.
अध्यक्षीय भाषणात वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे म्हणाले की महिलांना संरक्षणाची गरज आहे निर्णयक्षम महिलाही उज्वल समाजाची नांदी ठरू शकते बर्‍याच महिला चौकटीतले आयुष्य जगतात घराचा उंबरठा त्यांना ओलांडता येत नाही अशा महिलांना स्वतंत्र मिळाले तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाल्यासारखा होईल. असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक ऍडव्होकेट रामकृष्ण उपासनी यांनी केले कार्यक्रमास भीमराव जाधव ,पी एन भादलीकर सुमित कुलकर्णी ,प्रसाद जोशी, दीपक वाल्हे, उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सानेगुरुजी वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *