अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बिलखेडा येथे अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे तसेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. हे ट्रॅक्टर मुद्देमालासह अमळनेर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. पथकात वाय. आर. पाटील मंडळ अधिकारी हेडावे भाग, पी. एस. पाटील मंडळ अधिकारी वावडे भाग, अभिमन जाधव ग्राम महसूल अधिकारी कन्हेरे, विक्रम कदम ग्राम महसूल अधिकारी शहापुर, आशीष पारधे ग्राम महसूल अधिकारी वावडे व जितेंद पाटील ग्राम महसूल अधिकारी झाडी, व राजेन्द्र केदार ग्राम महसूल अधिकारी पळासदळ, पवन शिंगारे ग्राम महसूल अधिकारी सावखेड़ा, जितेंद जोगी ग्राम महसूल अधिकारी निम, सुधीर पाटील पाटील ग्राम महसूल अधिकारी गड़खांब यांचा समावेश होता.