अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात असलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडे असलेले गो वंश वाचावे पाणी व चाऱ्यावाचून शेतकऱयांनी आपले गो वंश कसायाला न विकता त्यांना घरपोच चारा व पाणी उपलब्ध करून देण्याची सोय श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई च्या माध्यमातून विविध गावात होत आहे
वर्धमान संस्कार धाम मुंबई व श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या संस्थेमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांकडे असणारे गो वंश भीषण दुष्काळी परिस्थिती व चाराटंचाईचा सामना करीत असतांना कुठल्याही परिस्थितीत कमी होऊ न देता त्यांना जागेवरच पिण्याचे पाणी व घास चारा उपलब्ध करून देत सकल जैन समाज ह्या साठी प्रयत्न करीत असून शिरूड,कावपिंप्री व इंद्रापिप्री ता अमळनेर तसेच सुमठाणे ता पारोळा या गावात गोपालक शेतकऱ्यांना जागेवर घास चारा उपलब्ध करून देत आहेत तर तालुक्यातील 22 गावांना मोफत पाण्याचे टँकर पाठवून तहानलेल्या गावांची तहान भागवत आहेत यासाठी मुंबई येथील संस्थेला अमळनेर तालुक्यातील सकल जैन समाजाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या मोहिमेत दुष्काळी परिस्थितीत असंख्य गो वंश वाचण्यास मदत होणार असून कितीही बिकट परिस्थिती आली तरी शेतकऱ्यांनी आपले गो वंश कसायाला न विकता वर्धमान संस्कार धाम मुंबई व श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ह्या दोन्ही संस्था उन्हाळा संपेपर्यंत आपल्या गो वंश साभाळण्याची जबाबदारी घेण्याचे निश्चित करीत असल्यामुळे शेतकऱयांनी भीषण दुष्काळी परिस्थिचा सामना करण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले आहे यावेळी श्री आदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट चे संचालक जयेशभाई जरीवाला मुंबई यांनी संपूर्ण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावून जून महिन्यापर्यंत अशाच प्रकारे मदत वाढवून देण्याचे आश्वासन दिले असून तालुक्याची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात येणार आहेत
यावेळी राजेंद्र शेठ, प्रकाश शहा,महेंद्र कोठारी,सुभाष कोठारी, महेंद्र पाटील,विक्रम पाटील, चेतन शहा,सचिन धनगर,सतिश वाणी, दिलीप डेरे आदी उपस्थित होते राजेंद्र शेठ, प्रकाश शहा,महेंद्र कोठारी, सुरेश कोठारी,महेंद्र पाटील,विक्रम पाटील, चेतन शहा,सचिन धनगर, सतिश वाणी,दिलीप डेरे,घनश्याम पाटील,अमित पाटील,अरुण मोरे आदी उपस्थित होते