अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेनाच्या अमळनेर तालुकाप्रमुखपदी सुरेश अर्जुन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्तीपत्रावर शिवसेना सचिव संजय मोरे यांची सही आहे.
यावेळी आमदार अमोल पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सहसचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील चौधरी, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, विष्णू भंगाळे, महिला जिल्हा प्रमुख सारिका माळी, अमळनेर शहर प्रमुख संजय कौतिक पाटील तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. माजी आमदार चिमणराव पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी जि. प. सदस्य तथा जळगाव युवा नेते प्रताप गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक विक्रांत पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, अमित ललवाणी, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहित कोकटा, संजय कौतिक पाटील, उप शहर प्रमुख युवा सेना प्रवीण पाटील, जालना जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, रिटा बाविस्कर, डॉ. प्रशांत शिंदे, ढेकू सिम सरपंच सुरेखा प्रवीण पाटील, हेडावे माजी सरपंच रवींद्र पाटील, रितेश बोरसे, ग्राहक कल्याण मंचचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर आदींनी स्वागत केले.