पावणे तीनशे वर्षांच्या परंपरेला लावली ‘मोगरी’, यंदा दोराने एवजी ट्रॅक्टरने ओढला जाणार रथ!
वाडी संस्थांनाच्या ‘किरकोळ’ निर्णयाने भाविकांच्या भावनांना पोहचणार ठेच..
अमळनेर (प्रतिनिधी) वाडी संस्थानने मोजक्या चार डोक्यांची बैठक घेत किरकोळ बदलाच्या नावावर पावणे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या रथाला दोर ऐवजी ट्रॅक्टरने ओढण्याचा निर्णय घेऊन भाविकांच्या भावनांवरच घाव घातला आहे. वाडी संस्थानचा हा निर्णय तार्कीक असला तरी तो भाविकांवर आणि पोलिसांवर दाखवलेला अविश्वास असून सर्वांनाच ठेच पोहचवणार आहे.
प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेर मधील संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सवाला पावणे तीनशेवर्षांची परंपरा आहे. म्हणूनच या यात्रोत्सवला लाखो भाविक हजेरी लावून दर्शन घेतात. यावर्षीं संस्थानने किरकोळ बदल आणि भाविकांच्या सुरक्षेचा, भावनेचाआणि श्रद्धेचा नावाने सुरुवातीला परंपरेप्रमाणे दोराने काही अंतर रथ ओढून नंतर ट्रॅक्टरनेरथ ओढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यासाठी संस्थानने मोजक्या डोक्यांना बोलावून घेतला आहे. खरे तर येथील आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते. यात्रोत्सवाचे वाडी संस्थान जरी संयोजन करीत असली तरी हा विषय भाविकांच्या श्रद्धेचा आहे, त्यांच्या भावानांचा आहे. याचा कुठेही विचार केला गेलेला नाही. अमळनेरचा रथ हा दोराने ओढला जातो, हे येथील भाविक पिढ्यांपिढ्या सांगत आले आहेत. या निर्णयाने आता रथ ट्रॅक्टरने ओढला जातो, असे पुढच्या पिढीला सांगावे लागणार आहे. मग यापुढे यात्रा ही डिजिटल भरेल का, पुढीच्या पिढीला मोबाईलमध्येच यात्रा पहावी लागेल का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. तशा भावनाही भाविकांनी खबरीलालकडे व्यक्त केल्या आहेत. दक्षिणत्या राज्यात आजही दोराने रथ ओढला जातो. तेथे काहीही होत नाही. मग अमळनेरच्या रथोत्सासाठी ती भिती का बाळगली जात आहे. मान्य आहे, किरकोळ घटना घडता. पण मोठा आघात झाला आहे, हे पावणेतीनशे वर्षाच्या इतिहासात कधीही घडलेले नाही, कारण येथील भाविक, नागरिक आणि कान्याकोपऱ्यातून येणारा भाविक हा समजदार असतो. म्हणून या यात्रोत्सवाला पावणेतीनशे वर्षाची परंपरा राहिली आहे. याचा विचार वाडी संस्थाने केला पाहिजे. किरकोळ बदलच्या नावाखाली संस्थाने काही अंतरापर्यंत दोराने रथ ओढू असे म्हटले असले तरी प्रत्येक भाविक त्यावेळी उपस्थित राहिल असे नाही, येणारा प्रत्येक भाविक किमान दोराला स्पर्श करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता दोरच राहणार नाही तर प्रत्येक भाविक रथाला स्पर्श करण्यासाठी धाव घेईल. तर अधिक गर्दी होऊन मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ दोराला स्पर्श करून भाविक यात्रोत्सवाचा आनंद लुटतात. या निर्णयामुळे भाविकांना रथला प्रदक्षिणा घालता येईल, असे संस्थानला वाटत आहे. परंतु प्रत्यक्षात ते कसे शक्य आहे. याच्याने उलट गर्दी झाली तर पोलिस प्रशासनावरील तान वाढून यात्रेला गालबोट लागण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे हा किरकोळ बदल नाही, तर खूप मोठा बदल आहे, संस्थांचे गादीपती प.पू. संत प्रसाद महाराज यांनी घेतलेला हा निर्णय त्यांना योग्य वाटत असेल तर तो त्यांनी तसाच ठेवावा. केवळ चार डोक्यांनी सुचवले म्हणून हा निर्णय घेतला असेल तर लाखो भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचवणारा असाच आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.