अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात हमी भावापेक्षा कमी भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 15 व्यापाऱ्यां विरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
2017 – 18 मधील उडीद , मूग ला 5400 ते 5575 चा भाव शासनाने जाहीर केला असताना अमळनेर बाजार समितीतील व्यापारी नितु हर्ष जैन , सुरेखा पुनमचंद छाजेड , हरी भिका वाणी , देवराज प्रसन्नचांद बाफना , संगीता विजय पारख, हर्ष प्रकाश जैन , विजय गुलाबचंद जैन , हेमलता देवराज बाफना , महेंद्र मोहनलाल जैन , वृषभ प्रकाश पारख , योगेश चुडामन शेटे , शंकरलाल तेजुमाल बितराई, विनोदकुमार कांतीलाल कोठारी , शेख कौसर अहमद , यांनी शेतकऱयांना फक्त 2700 ते 4500 भाव असल्याचे दाखवून फसवणूक केली शेतकऱ्यांना बोगस पावत्या देण्यात आल्या याबाबत गावरान जागल्या संघटना चे अरुण बाबुराव देशमुख यांनी प्रांताधिकारी , तहसीलदार , सहाय्यक निबंधक , पोलीस स्टेशनला तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र दखल घेतली गेली नाही म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पावत्यांवर नॉन एफ ए क्यू चा शिक्का नसल्याने त्यांचा माल उच्च प्रतीचा होता तरी त्यांना कमी भाव देण्यात आला ही बाब न्यायलायच्या निदर्शनास आल्यांनातर न्यायालयाने व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अमळनेर पोलिसात भादवी 199 , 420 , 468 ,464 ,34 प्रमाणे फसवणूकी चा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास साह्ययक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत