अमळनेर तालुक्यातील अनेक मंदिरांना पर्यटन विकास मंत्रालयाकडून मिळणार निधी

आ सौ स्मिता वाघ यांच्या विनंतीवर ना जयकुमार रावल यांचे संकेत,पांझरा नदीवरील बंधारा दुरुस्तीचेही आश्वासन

अमळनेर– मुंबई येथे राज्याचे पर्यटन व रोजगार हमी मंत्री.नामदार जयकुमार रावल यांनी अमळनेर तालुक्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्द करण्याचे संकेत दिले आ सौ स्मिता वाघ यांनी मागणीनुसार दिले आहेत. याचसोबत पांझरा नदीवरील बंधारा दुरुस्तीसाठी देखील निधी उपलब्द करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
आमदार सौ स्मिता उदय वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथील आदीशक्ती एकवीरा माता मंदिर, मुडी प्र.डांगरी येथील महालक्ष्मी मंदिर, मांडळ येथील म्हाळसा माता मंदिर तसेच रडावण येथील मंदिरासाठी पर्यटन विकास निधी मंजूर करावा तसेच मांडळ व वालखेडा ता.शिदंखेडा येथील पांझरा नदीवरील बंधारा दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मुंबई मंत्रालय येथे दि 5 मार्च रोजी घेतलेल्या भेटीप्रसंगी ना रावल यांच्याकडे केली होती,यावर मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच हे काम मांर्गी लागेलं असे शुभसंकेत दिले. यावेळी त्यांच्यासोबत डाॅ. दिपक पंढरीनाथ पाटील माजी सभापती, हेमंत सोनवणे माजी चेअरमन वि.का.सोसायटी मुडी प्र.डांगरी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *